सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सातारा शहरातील लोकसभा निवडणुक मतमोजणी निकालाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत बदल.
लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने ४५ - सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतमोजणी ही सातारा शहरातील नवीन एम. आय. डी. सी. हद्दीत डी. एम. ओ. गोडावून येथे दि. ०४/०६/२०२४ रोजी होणारआहे. या मतमोजणीचा निकाल ऐकण्याकरीता मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होणार असलेने
डी.एम.ओ.गोडावुन परिसरात मतमोजणी कालावधीत वाहतुक व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक आहे.
मी समीर शेख भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि.०३/०६/२०२४ रोजीचे ११.५५ वा. पासुन ते दि. ०४/०६/२०२४ रोजीचे रात्रौ २०.०० वा.पर्यंत खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करीत आहे याची नोंद घ्यावी.
वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग-
दि.०३/०६/२०२४ रोजीचे १९.५५ वा. पासुन खालील नमुद मार्गावर वाहतुकीकरीता बंदी करणेत येत आहे.
१) वेणुगोपाल फुड्स (पारले कंपनी) ते कवित्सु कंपनी युनिट नं. २ कंपनीकडे डी. एम. ओ. गोडावुन समोरुन येणारे
जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना (शासकीय वाहने वगळुन येणे जाणेस पुर्णत: प्रवेशबंदी करणेत येत आहे.
२) सुटकेस चौक येथून वेणुगोपाल फुडस कंपनीकडे येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
३) अजिंक्यतारा सहकारी कृषीकेंद्राकडुन कृषीटेक कंपनी मार्गे डी.एम.ओ. गोडावुनकडे येणारे-जाणारे
सर्व वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
४) भोर फाटयाकडुन डी. एम. ओ गोडावुनकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना (शासकीय वाहने वगळुन )प्रवेशबंदी करणेत येत आहे.
पार्किंग ठिकाणे -
१) भोर फाटा येथून नवीन एम.आय.डी.सी. कडे जाणारे वाहने रोडचे बाजुला पार्किंग करता येतील.
२) जानाई मळाई रस्त्याने निवडणुक मतमोजणी निकालासाठी येणारे वाहनांना तळयाजवळील पार्किंगपर्यंत जाता येईल.
Post a Comment
0 Comments