Type Here to Get Search Results !

चोरीस गेलेले 34 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लोणंद पोलिसांच्याकडून हस्तगत

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

चोरीस गेलेले 34 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लोणंद पोलिसांच्याकडून हस्तगत.


लोणंद पोलीस स्टेशनची दमदार कारवाई.,

गुन्हयात चोरीस गेलेला 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे 2,31,200 रुपये किंमतीचे

आरोपीकडुन केले हस्तगत

दिनांक 21/3/2024 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 या वेळेत मौजे अंदोरी ता.

खंडाळा येथून प्रल्हाद बबन कुदळे यांचे राहते घरातुन 34 ग्रॅम वजनाचे सोनाचे दागीणे चोरीस गेले

होते. आरोपीचा शोध घेऊन त्याचेकडुन 100% मुददेमाल हस्तगत करणेकामी मा. श्री समीर शेख

पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल रा. धस

उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल

बी.भोसले सहा.पोलीस निरीक्षक, यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्री सुशिल बी. भोसले यांनी

पोलीस पथके तयार करुन गुन्हयाचे कामी बाळु किसन खंडाळकर वय 47 रा. परिंचे ता. पुरंदर जि.

पुणे यास दिनांक 24/5/2024 रोजी अटक करुन दिनांक 29/5/2024 रोजी पर्यंत मा. प्रथमवर्ग

न्यायदंडाधीकारी सोळा, खंडाळा येथुन पोलीस कोठडी मंजुर करुन घेऊन गुन्हयात चोरीस गेलेले

34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे सुमारे 2,31,200 /- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला

आहे.

सदरची कारवाई मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर

पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे

मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस

निरीक्षक, पोलीस हवालदार धनाजी केशन भिसे, संतोष दत्तात्रय नाळे, विठठल बबन काळे,

सर्जेराव दिनकर सुळ, केतन लहु लाळगे, विष्णु कोंडीबा धुमाळ, महेश सपकाळ, संजय आण्णा

बनकर, नितीन प्रल्हाद भोसले, सतीष पोपटराव दडस, अभिजीत किसन घनवट,

संजय एकनाथ

चव्हाण, गणेश शेळके, शुभांगी शिंदे, मयुरी लोहार, संतोष गडदे, आनंदा केंजळे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments