Type Here to Get Search Results !

पर्यावरण रक्षणासाठी महाविद्यालयीन युवकांनी पुढाकार घ्यावा- राहुल निकम

 पर्यावरण रक्षणासाठी महाविद्यालयीन युवकांनी पुढाकार घ्यावा- राहुल निकम


प्रतिनिधी दादा जाधव


फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे पर्यावरण रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना फलटण परिमंडळ वनक्षेत्र अधिकारी श्री. राहुल निकम बोलत होते. यावेळी  वनश्री पुरस्कार प्राप्त प्रा. सुधीर इंगळे, मंगेश कर्वे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राहुल निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. युवकांनी जर सक्रिय पणे पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला तर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल. अभियांत्रिकी महाविद्यालय यामध्ये नेहमीच अग्रेसर असते असे प्रतिपादन यावेळी राहुल निकम यांनी केले. 


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धना संबंधित कामाची माहिती दिली. महाविद्यालय परिसरात तसेच शेजारील भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सज्ज व्हावे असे आवाहन प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी केले. 

प्रा.आदित्या जाधव यांनी सुत्रसंचलन,प्रा.ज्योती टिळेकर यांनी प्रत्सावना व प्रा.प्रतिमा भोसले यांनी आभार प्रदर्शन केले


Post a Comment

0 Comments