Type Here to Get Search Results !

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिन तथा मुधोजी दिन उत्साहात साजरा .


 फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिन तथा मुधोजी दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी 

दादा जाधव 


फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचा ७२ वा वर्धापन दिन तथा मुधोजी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांच्या हस्ते व महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच फलटण संस्थान चे भुतपुर्व अधिपती कै. श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर, कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.  संस्था वर्धापन दिनानिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण व श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण यांच्या संघात सिझन बाॅल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

 फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी २५ आॅगस्ट हा दिवस संस्था वर्धापन दिन तथा मुधोजी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. आज फलटण एज्युकेशन सोसायटी शिक्षणाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असुन फलटण परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी केले. संस्थेतील सर्व स्टाफ मेंबर्स ना संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संस्था वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments