दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला
वैभव जगताप /फलटणफलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये मंगळवार दिनांक 29/08/2023 रोजी रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारे हंगे सर व बोडरे सर उपस्थित होते . सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमासाठी मुले रंगीत ड्रेस मध्ये तयार होऊन आले होते. सर्व शिक्षकांनी फुले व राखी हळदीकुंकू साखर व पेढे हे साहित्य एकत्र करून सुंदर अशी ताटे सजवली होती .त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी मुलांना रक्षाबंधन विषयी शुभेच्छा देत माहिती सांगितली. त्यानंतर छोट्याशा मुलींनी प्रमुख पाहुणे यांचे औक्षण करून राखी बांधली. रक्षाबंधन निमित्त मुलींनी राखी आणली होती व मुलांनी मुलींना देण्यासाठी गिफ्ट आणले होते. मुलींनी मुलांचे औक्षण करून राखी बांधली व मुलांनी मुलींना गिफ्ट दिले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .अशाप्रकारे रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम, शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार, मोनाली कुलकर्णी, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर,शिरीन मुलाणी, मोनाली जाधव, अश्विनी गायकवाड , सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षकवृंद उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments