सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
रहिमतपुर पोलीस ठाणेची हददीतील तक्रारदार यांचे गहाळ झालेले १,८०,०००/- रकमेचे एकुण १० मोबाईल तक्रारदार यांना परत.
( रहिमतपुर पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगिरी )
मा. तुषार दोषी सो, पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक
सातारा, मा. श्रीमती सोनाली कदम, उपविभागिय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. सचिन कांडगे, सहायक पोलीस निरीक्षक, रहिमतपुर पोलीस ठाणे यांनी रहिमतपुर पोलीस ठाणे हददीतील
नागरिकांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेणेकामी रहिमतपुर पोलीस ठाणे अंतर्गत पथक तयार करुन
हरविलेले मोबाईलचा शोध घेण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे रहिमतपुर पोलीस ठाणेकडुन सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. जी.बी.केंद्रे, पोलीस अंमलदार महेश देशमुख यांनी
सी.ई.आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबींचे आधारे महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील मोबाईल मिळालेल्या
लोकांशी संपर्क साधुन हरविलेल्या मोबाईलबाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परिश्रम करुन
मोबाईल शोध मोहिम राबविल्याने माहे जुन-२०२५ महिन्यामध्ये रहिमतपुर पोलीस ठाणे हददीतील नागरिकांचे
गहाळ झालेले १,८०,०००/- रु. किंमतीचे एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. सदरचे
मोबाईल श्री. सचिन कांडगे, सहायक पोलीस निरीक्षक, रहिमतपुर पोलीस ठाणे यांचे हस्ते मुळ तक्रारदार
यांना आज रोजी परत करण्यात आलेले आहेत. सदरची मोहिम अविरतपणे राबवण्यात येणार असल्याचे श्री.
सचिन कांडगे, सहायक पोलीस निरीक्षक, रहिमतपुर पोलीस ठाणे यांनी सांगितलेले आहे.
सदरची कारवाई मा.तुषार दोषी सो, पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती वैशाली कडुकर, अपर
पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती सोनाली कदम, उपविभागिय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण, यांचे
मार्गदर्शनाखाली श्री. सचिन कांडगे, सहायक पोलीस निरीक्षक रहिमतपुर पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक
श्री. जी.बी. केंद्रे पोलीस अंमलदार महेश देशमुख, यांनी पार पाडलेली आहे.
टीप :- रहिमतपुर पोलीस ठाणेकडुन सन २०२४-२५ या कालावधीमध्ये आजमितीपर्यंत तक्रारदार यांचे गहाळ
झालेले एकुण ५९ मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आलेले आहेत.
Post a Comment
0 Comments