सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षारोपण.
वटवृक्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून, आषाढी एकादशीचे औचित्य साधत,वडगाव निंबाळकर (ता.बारामती) येथील स्वातंञ्य विद्या मंदिर प्रशालेच्या समोरील गावठाण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी,श्री नवनाथ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रोहन खोमणे व जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान, या फाऊंडेशनच्या माध्यमातून, नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी आषाढी एकादशीचे औचित्य साधून,वड,बेल,चिंच,कडुलिंब,पिंपळ आदी प्रकारची १०० झाडे लावण्यात आली आहेत. दरम्यान, वृक्षारोपण केलेल्या झाडांना,'वटवृक्ष फाऊंडेशन'चे सदस्यांनी या झाडांचे पालकत्व स्वीकारले असून,या झाडांना पाणी देऊन चंगल्या प्रकारे निघा राखत आहेत.
यावेळी गणेश रांगोळे,अक्षय जाधव, पुष्कराज गायकवाड, सुमित भोसले,विशाल हिरवे,अथांग जाधव,अविनाश टेंबरे,रितेश हिरवे,ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र चव्हाण आदि फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments