सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
महाबळेश्वर हॉटेल ऑक्सिजन येथील इलेक्ट्रॉनिक, फर्निचर, भांडी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुंबई विमानतळावर केली अटक.
(स्थानिक गुन्हे शाखा सातारा व महाबळेश्वर पोलीस ठाणे यांची कारवाई.)
(महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजन येथील इलेक्ट्रॉनिक, फर्निचर, भांडी वगैरे साहित्य घरफोडी चोरी
करुन दुबई येथे पळूण जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरटयास मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेवून
त्याचेकडून गुन्हयात चोरी केलेले ९,९०,८५०/- रुपयाचे साहित्य व साहित्य घेवून जाण्यासाठी वापरलेला ट्रक
व टेम्पो असा एकूण १७,९०,८५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.)
दिनांक २५/०६/२०२५ रोजीचे १६.०० ते दि. २८/०६/२०२५ रोजीचे १२.०० वा. चे दरम्यान हॉटेल ऑक्सिजन
महाबळेश्वर येथून अज्ञात चोरटयाने ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, भांडी वगैरे साहित्य
मुद्दाम लबाडीने फियादी यांचे संमतीशिवाय चोरी केले होते. सदर बाबत महाबळेश्वर पोलीस ठाणे गुरनं ५८ / २०२५
भा.न्या.सं.क ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर
अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई उपविभाग वाई
यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण
देवकर व महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक
गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक
रुपाली काळे यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना
दिल्या.
तपास पथकांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून फिर्यादी, साक्षीदार व आजुबाजूच्या लोकांच्याकडे
कौशल्याने तपास केला, घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करुन गोपनिय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने केला असल्याचे निष्पन्न केले. त्या अनुशंगाने तपास पथक नमुद
आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होते.
दिनांक ०६/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना नमुद गुन्हयातील संशईत आरोपी हा
दुबई येथे
पळूण जाणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक
परितोष दातीर, पोलीस अंमलदार प्रविण कांबळे, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रवि
वर्णेकर, नवनाथ शिंदे यांना तात्काळ मुंबई विमान तळ येथे जावून नमुद आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात
घेण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथक तात्काळ छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे
दाखल झाले. तेथे सहार पोलीस ठाणे मुंबई यांचे मदतीने आरोपी विमानतळावर चेकइन करीत असताना त्यास
ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा माल सातारा येथील
भंगार व्यावसायिक यास विकला असल्याचे सांगीतले. नमुद आरोपीस व त्याचे इतर दोन भंगार
व्यावसायिक साथिदार यांना गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचेकडून त्यांचे गोडावून मधून चोरी
केलेला ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, भांडी वगैरे तसेच सदरचा
माल नेण्यासाठी वापरलेली ८,00,000/- रुपये किमतीचा ट्रक व टेम्पो असा एकूण १७,९०,८५०/-
रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व
श्री. बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर महाबळेश्वर पोलीस
ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, महिला
पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार
विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश
महाडीक, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, प्रविण कांबळे, अविनाश चव्हाण, मुनीर
मुल्ला, शिवाजी भिसे, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमोल माने,
स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, राकेश खांडके, सनी आवटे, अमित सपकाळ, हसन तडवी, राजू कांबळे, मोहन
पवार, ओकार यादव, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रविराज वर्णेकर, रोहित निकम, प्रविण पवार, विशाल
पवार, संकेत निकम, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, विजय निकम,
महाबळेश्वर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार जितेंद्र कांबळे, नवनाथ शिंदे, सलिम सय्यद यांनी सहभाग घेतला
असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती
डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments