सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शिवथर येथे भरदिवसा झालेल्या विवाहित महिलेच्या खुनाचा तपास ८ तासाच्या आत उघड.
अनैतिक प्रेमसंबधातुन झालेल्या खुनाच्या गुन्हयातील प्रियकर आरोपीस ८
तासाच्या आत सातारा तालुका पोलीसांचेकडुन अटकः-
दि. ०७/०७/२०२५ रोजी दुपारी १२.०० वा ते ३.३० वा चे दरम्यान मौजे शिवथर ता. जि. सातारा गावचे हददीत
अशोक लक्ष्मण साबळे रा. शिवथर ता.जि. सातारा यांची मयत मुलगी नामे पुजा प्रथमेश जाधव वय २७ वर्षे रा. शिवथर
ता.जि. सातारा हीचा तीचे रहाते घरात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी गळयावर धारदार शस्त्राने वार करुन
तीचा खुन केलेला आहे. वगैरे मजकुरचे खबरीवरुन सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं २४५/२०२५ बी.एन.एस कलम
१०३(१) प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
गुन्हा दाखल होताच मा.पोलीस अधिक्षक साो. तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो वैशाली कडुकर व
उपविभागीय पोलीस अधिकारी साो, राजीव नवले हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन तात्काळ खुनाचा गुन्हा उधडकीस आणुन
आरोपीला अटक करणेबाबत सातारा तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना सुचना दिल्या त्यानुसार
पोनि सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी आरोपीचा शोध घेणेकामी वेगवेगळी तपास पथके तयार करुन आरोपीचे शोधकामी
रवाना करणेत आलेली होती. सातारा तालुका पोलीस ठाणेकडील पथकाने तपास करुन माहीती प्राप्त केली की, मयत पुजा
प्रथमेश जाधव ही विवाहीत असुन तीचे शिवथर गावातील एक इसम वय २८ य याचे सोबत गेले ६ वर्षापासुन अनैतिक
प्रेम संबध होते. प्रियकर आरोपीने मयत पुजा हीस आपण पळुन जावुन लग्न करु असा वारंवार तगादा लावलेला होता. परंतु
मयत पुजा हीने त्यास नकार दिलेला होता.
दि. ०७/०७/२०२५ रोजी प्रियकर आरोपी हा मयत पुजा जाधव हीचे रहाते घरी जावुन तीस आपण पळुन जावुन लग्न
करु असे म्हणाला परंतु मयत पुजा हीची इच्छा नसल्याने तीने आरोपी प्रियकरास पळुन जावुन लग्न करण्यास नकार दिला
याच कारणावरुन आरोपीने चिडुन जावुन पुजा हीचा हाताने गळा दाबुन धारदार शस्त्राने गळयावर वार करून गंभीर जखमी
करुन खुन केला व पळुन गेलेला आहे. आरोपीचे नाव निष्पन्न होताच गापणीय माहीती तांत्रिक विष्लेशन करुन आरोपी हा
पुणे येथे पळुन गेलेला असल्याची माहीत होताच शिताफिने ताब्यात घेवुन सदरचा खुनाचा गुन्हा ८ तासामध्ये उघडकीस
आणण्यास तपास पथकांना यश प्राप्त झाले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो, तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो वैशाली कडुकर व
उपविभागीय पोलीस अधिकारी साो, राजीव नवले याचे मार्गदर्शनुसार व सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री
निलेश तांबे यांचे सुचनांप्रमाणे सातारा तालुका पोलीस ठाणेकडील सपोनि विनोद नेवसे, सपोनि अनिल मोरडे, पोलीस
उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस उपनिरीक्षक सोनु शिंदे, पो. हवा दादा स्वामी, पोहवा पंकज ढाणे, पोहवा राजु
शिखरे,पोहवा मालोजी चव्हाण, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा रामचंद्र गोरे, पोहवा संदीप आवळे, पोहवा राहुल
राउत, पोहवा सनि पिसाळ, पोहवा कुमठेकर, पोना सतिष वावर, पोना किरण जगताप, पोशि सुनिल, पोकॉ संदिप पांडव, या
पथकाने गुन्हयातील अज्ञात आरोपीबाबत काहीएक माहीती नसताना कौशल्यपुर्वक कामगीरी करुन शिताफीने प्रियकर
आरोपीस ८ तासाचे आत मध्ये अटक करुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
Post a Comment
0 Comments