Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर ते पोलादपुर मार्गावरती दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद .

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

महाबळेश्वर/ राहुल शेलार 

महाबळेश्वर ते पोलादपुर मार्गावरती दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद .


उपरोक्त विषयास अनुसरुन सादर करण्यात येते की, तहसिलदार पोलादपुर यांनी महाबळेश्वर ते

पोलादपुर रस्त्यावर पोलादपुर हद्दीमध्ये मोठी दरड कोसळली असून सदर दरड काढणेसाठी 4 ते 5 दिवसाचा

कालावधी लागणार असलेने पोलादपुर कडून येणा-या वाहनांना रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद केलेबाबत

कळविणेत आलेले आहे. तसेच महाबळेश्वर कडून पोलादपुर कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद

करणेबाबत कळविणेत आलेले आहे.

त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपुर कडे जाणारा रस्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद करणे आवश्यक आहे.

अशी इकडील मत आहे. तरी त्याअनुषंगाने संबंधित यंत्रणांना सूचना देऊन सदरचा रस्ता बंद करणेच्या अनुषंगाने

उचित कार्यवाही होणेस विनंती आहे.

Post a Comment

0 Comments