सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
इयत्ता ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी मुधोजी महाविद्यालय सज्ज.
दि.१२ फलटण,इयत्ता अकरावी ची शैक्षणिक वर्ष 2025- 26 ची प्रवेश प्रक्रिया यावर्षी राज्य शासनाने ऑनलाईन सुरू केलेली आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी अल्प कालावधी राहिलेला असून त्याबाबतची मार्गदर्शक सूचना दिलेली आहे. प्रथम यादीमध्ये नाव विद्यार्थ्याचे येऊन सुद्धा जे विद्यार्थी अद्याप काही कारणाने महाविद्यालयाकडे प्रवेश घेऊ शकलेले नाहीत त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दिनांक 17 जुलै 2025 वार गुरुवार रोजी दुसरी प्रवेश फेरी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे, यासाठी विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करून दुसऱ्या यादीतील प्रवेश निश्चित करावा असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी . एच्. कदम सर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ भोसले यु. एस. यांनी केले आहे. दुसऱ्या यादीत नाव येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुधोजी महाविद्यालय विद्यार्थी व पालक वर्गाला सहकार्य व मार्गदर्शन तसेच प्रवेश प्रक्रियेतील सर्व समस्या सोडवून विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेता यावा यासाठी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक टीम सज्ज असल्याचे सांगितले. फलटण तालुका व परिसरातील कोणताही विद्यार्थी प्रवेशा वाचून वंचित राहू नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
Post a Comment
0 Comments