Type Here to Get Search Results !

शिरवळ पोलीसांकडून हरवलेले १,०८,०००/- रुपये किंमत स्मार्ट फोन हस्तगत.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

शिरवळ पोलीसांकडून हरवलेले १,०८,०००/- रुपये किंमत स्मार्ट फोन हस्तगत.


 ( शिरवळ पोलीस ठाणे जि. सातारा यांची कारवाई )

सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर

साो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस साो, शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस

निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेणेकामी शिरवळ

पोलीस ठाणेचे डी. बी. पथकास सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने डी.बी. पथकातील पोलीस

स्टाफने सी.ई.आर. पोर्टल व तांत्रीक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन वेगवेगळया जिल्हयातुन हस्ते परहस्ते

वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले

एकुण ७ मोबाईल फोन किंमत १,०८,०००/- रुपयेचे स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले

असुन सदरची मोहीम वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याचे शिरवळ पोलीस निरीक्षक

याशवंत नलावडे यांनी सांगीतले आहे.

तसेच शिरवळ पोलीस ठाणे गुन्ह र.नं. ३७७/२०२३ भा.द.वि कलम ३८१ प्रमाणे दाखल गुन्हा

उघडकीस आणुन त्याचे तपासा दरम्यान जप्त करण्यात आलेले वगवेगळया कंपनीचे एकुण किंमत

३,९०,०००/- रुपयेचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. सदर जप्त मोबाईल फोन परत मिळणे

करीता गुन्हयातील फिर्यादी मयुर शिंदे यांनी मा. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे मा.

न्यायालयाने सदर जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचे आदेशीत केले आहे. तरी सदरचा मुद्देमाल

आज रोजी त्यांना परत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. तुषार दोशी साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर

अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण,

पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकुन स. पो.फौ. सुर्यवंशी, गुन्हे

प्रकटीकरण पथकाचे पोहवा सचिन वीर, पो. कॉ. सुरज चव्हाण, अजित बोराटे, मंगेश मोझर, अक्षय

बगाड यांनी केलेली आहे. सदरच्या उल्लेखनिय कामगीरीबाबत शिरवळ पोलीस ठाणेचे सर्व पोलीस

अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर,

अपर पोलीस अधिक्षक, श्री राहुल धस साो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले

आहे.

Post a Comment

0 Comments