सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
महाराष्ट्र शासन "विकसित महाराष्ट्र 2047" हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे.
🏛️ भारतीय स्वातंत्र्याला २०४७ साली १०० वर्षे पूर्ण होईल. त्या काळात विकसित भारताबरोबरच विकसित महाराष्ट्राचे स्वरूप कसे असेल, याचा अंदाज घेण्यासाठी महाराष्ट्र शासन "विकसित महाराष्ट्र 2047" हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. हे दस्तऐवज राज्याच्या शाश्वत आणि समावेशक विकासाचा आराखडा असेल. या आराखड्यात सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा समाविष्ट व्हाव्यात, याकरिता त्यांच्या मते जाणून घेण्यासाठी हे नागिरक सर्वेक्षण आयोजित केले जात आहे. ✨
🗣️ या सर्वेक्षणाद्वारे नागरिकांचे जीवनमान, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी याविषयीचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
💡 या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या भविष्याच्या "विकसित महाराष्ट्र 2047" या आराखड्याला आकार देण्याचे नागरिकांना सातारा जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments