Type Here to Get Search Results !

फसवणुकीच्या एकुण ०३ गुन्हयातील फरार आरोपीस अटक

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फसवणुकीच्या एकुण ०३ गुन्हयातील फरार आरोपीस अटक



पोलीस ठाणे अभिलेखावरील फसवणुकीचे गुन्हयातील सराईत आरोपीत नामे रोहित सदाशिव पवार

उर्फ सागर पवार व निहाल युनुस पिरजादे दो. रा. पिंपरी, ता.कोरेगांव, जि. सातारा यांनी मोजे तारगांव येथील

तक्रारदार यांचे भाच्यांना जिल्हा परिषद सातारा येथे आरोग्यसेवक म्हणुन नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन

तक्रारदार यांचेकडुन त्याकामी रक्कम स्विकारली होती. आरोपीत नामे रोहित सदाशिव पवार उर्फ सागर

पवार व निहाल युनुस पिरजादे यांची जिल्हा परिषद सातारा येथे कोणतीही ओळख नसल्याचे व त्यांनी

तक्रारदार यांची फसवणुक केल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी पोलीस ठाणेस दिलेल्या

तक्रारीवरुन आरोपीत नामे रोहित सदाशिव पवार उर्फ सागर पवार व निहाल युनुस पिरजादे यांचेविरुध्द

गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये रोहित सागर पवार यास यापुर्वी अटक करण्यात

आलेली होती. परंतु गुन्हा दाखल झालेपासुन निहाल युनुस पिरजादे हा फरार होता. तसेच त्याचेविरुध्द भोर

पोलीस ठाणे, राजगड पोलीस ठाणे येथेदेखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

मा.पोलीस अधिक्षक श्री. तुषार दोषी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर,

मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सो श्रीमती सोनाली कदम यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणेस पाहिजे व

फरार आरोपीतांचा शोध घेवून त्यांचे अटकेबाबतची कार्यवाही करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या होत्या.

सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीत निहाल युनुस पिरजादे याचा गुन्हा दाखल झाल्यापासुन शोध घेणे

चालु होते. आरोपीत पोलीसांना चकवा देवुन त्याचे अस्तित्व लपवुन होता. आज रोजी आरोपीत त्याचे गावी

येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त होताच पोलीस पथकाने सापळा रचुन आरोपीत निहाल पिरजादे यास

ताब्यात घेवुन त्यास रहिमतपुर पोलीस ठाणेस दाखल गुन्हयात अटक केलेली आहे. तसेच भोर पोलीस ठाणे,

राजगड पोलीस ठाणे येथे सदरचा आरोपीत हस्तातरीत करण्याबाबत संबंधित पोलीस ठाणेस कळविण्यात

आलेले आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री. श्री. तुषार दोषी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो

श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सो श्रीमती सोनाली कदम यांचे मार्गदर्शनाखाली

रहिमतपुर पोलीस ठाणेचे सपोनि सचिन कांडगे व पोउपनि जी.बी.केंद्रे, पोलीस अंमलदार सचिन माने व महेश

देशमुख यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments