Type Here to Get Search Results !

एक कोटी ९१ हजार चाळीस रुपये किंमतीची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

एक कोटी ९१ हजार चाळीस रुपये किंमतीची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त. 


स्थानिक गुन्हे शाखा साताराची मोठी कारवाई

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा,

अवैध / बनावट दारुची वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना अरुण देवकर, पोलीस

निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करणेकरीता सपोनि रोहित फार्णे,

पोउनि परितोष दातीर, विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली विशेष पथके तयार करुन कारवाई करणेच्या सुचना दिल्या

होत्या.

दि. २९/०४/२०२५ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे बातमीदारामार्फत

माहिती मिळाली की, अशोक लेलन्ड कंपनीचा ट्रक क्र. एम.एच. ५०/४०९६ मधुन बनावट दारुची चोरटी वाहतुक होणार

आहे. अशी माहीती मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांचे अधिपत्याखालील पथकास सदर ठिकाणी

जावुन कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांचे पथकाने बोरगाव

ता. जि. सातारा गावचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे सर्व्हिस रोडवर उरमोडी नदीचे जवळ पहाटे ०३.१० वा. चे सुमारास

राज्य उत्पादन शुल्क यांचेकडील भरारी पथकासह छापा टाकुन कारवाई केली असता, नमुद इसमाचे कब्जात रॉयल किंग

स्पेशन मॉल्ट व्हिस्की, रॉयल ब्लॅक अॅपल वोडका, रॉयल ब्ल्यू मॉल्ट व्हीस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या ८४,४१,०४०/- रु.

किं.चा बनावट विदेशी दारुचा माल व १६,५०,००० /- रु. किं.चा ट्रक असा एकुण १,००,९१,०४०/- रुपये किं.चा माल

मिळुन आला असुन, सदर इसमांवर बोरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक

सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई मध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. माधव

चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सातारा, सहा. पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, बोरगाव पोलीस स्टेशन, स्थानिक

गुन्हे शाखेकडील, सहा. पोलीस निरीक्षक, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, सहा.फौ.

विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, पो.हवा. साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, शरद बेबले, प्रविण फडतरे, सनी

आवटे, अमित झेंडे, अजय जाधव, रोहित तोरस्कर, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, प्रमोद सावंत, अमित

सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रविण कांबळे,

ओंकार यादव, रविराज वर्णेकर, धिरज महाडीक, केतन शिंदे, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार चालक संभाजी साळुंखे,

विजय निकम, शिवाजी गुरव, बोरगाव पोलीस स्टेशनकडील मपोउनि स्मिता पाटील, प्रविण शिंदे, संजय जाधव, राज्य

उत्पादन शुल्क सातारा कडील दुय्यम निरीक्षक, अजितकुमार पाटील, विजय मरोड, जितेंद्र देसाई, कॉन्स्टेबल मनिष माने,

नरेंद्र कलकुटगी, शंकर चव्हाण

यांनी सहभाग घेतला आहे.

Post a Comment

0 Comments