सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण,/ वैभव जगताप
खंडकरी शेतकऱ्यांची एका एकराच्या आतील जमिनीचे वाटप सोमवारी श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते होणार..!
खंडकरी शेतकरी व महामंडळातील कामगारांना न्याय देणारा रामराजे समितीच्या अहवालाला अभुतपुर्व यश.
खंडकरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार-श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
एक एकराच्या आतील जमिनीचे वाटप आचारसंहितेच्या पूर्वी करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दिली होती त्याची वचनपूर्ती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे माहिती खंडकरी शेतकऱ्यांचे अध्यक्ष लक्ष्मणराव(तात्या )नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांची एका एकराच्या आतील जमिनीचा वाटप समारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व आमदार दीपकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत फलटण तालुका पंचायत समितीच्या सभागृहात ,सोमवार दिनांक.७/1१०/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे ,तरी फलटण तालुक्यातील सर्व खंडकरी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव नाईक निंबाळकर (तात्या)यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments