Type Here to Get Search Results !

सातारा पोलीस दलामार्फत क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता निवड...!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सातारा पोलीस दलामार्फत क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता निवड...!


सातारा पोलीस दलामार्फत सुरु करणेत आलेल्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत

असलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे शालेय विभागीयस्तर क्रीडा स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन करुन शालेय राज्यस्तरीय

क्रीडा स्पर्धेकरीता निवड...

सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय अंतर्गत सुरु करणेत आलेल्या

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये कुस्ती, ज्युदो, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, बॉक्सींग, मल्लखांब, अॅथलेटिक्स,

बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश करुन पोलीस पाल्य व इतर नागरिक यांचे करीता माफक शुल्कामध्ये प्रशिक्षण

वर्ग सुरु

करणेत आले आहेत. सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांनी

शालेय विभागीयस्तर क्रीडा स्पर्धामध्ये २० सुवर्ण पदक, ०७ रजत पदक, ०५ कांस्य पदक अशी एकूण ३२ पदके मिळवून

२० खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे...

> ज्युदो :- दि.१८/०९/२०२४ से दि. १९/०९/२०२४ रोजी कोल्हापुर येथे आयोजित १४ वर्षा खालील १७ वर्षा

खालील, १९ वर्षाखालील विभागीय शालेय क्रीडा ज्युदो स्पर्धा.

१७ वर्षाखालील मुले सुवर्ण पदक:- यशराज राजेंद्र जाधव (+९० किलो).

१९ वर्षांखालील मुले सुवर्ण पदक:- प्रथमेश प्रशांत कांबळे (४५ किलो), वेदांत विनायक पवार (८१ किलो).

१९ वर्षाखालील मुली सुवर्ण पदक:- समिक्षा सुनिल देखणे (४४ किलो), प्रणाली युवराज इथापे (५२ किलो).

१४ वर्षाखालील मुले रौप्य पदक:- ओम प्रशांत साळुंखे (३५ किलो) शौयं सनी अवटे (+५० किलो).

१७ वर्षांखालील मुले रौप्य पदक :- हिमांशु बापु ठाकुर (५० किलो), आदित्य अमर अवघडे (७३ किलो).

१९ वर्षाखालील मुले रौप्य पदक :- स्वस्तिक पांडुरंग कांबळे (५० किलो).

बॉक्सींग :- दि. ०२/१०/२०२४ ते दि.०४/१०/२०२४ रोजी सांगली येथे आयोजित १४ वर्षा खालील, १७ वर्षा

खालील, १९ वर्षाखालील विभागीय शालेय बॉक्सींग स्पर्धा.

१४ वर्षा खालील मुले सुवर्ण पदक :- यश भगवान निकम (३०-३२ किलो), दिव्यांशु दिग्वीजय डुबल (३८-४०

किलो), शौर्य योगेश बनकर (४८-५० किलो).

१७ वर्षा खालील मुले सुवर्ण पदक:- ओम प्रमोद व्हटकर (७०-७५ किलो), ऋशिकेश अनिल आपटे (७५-८०

किलो).

१७ वर्षा खालील मुली सुवर्ण पदक:- समृधी सतिश शिंदे (५२-५४ किलो), श्रावणी जितेंद्र भोसले (५४-५७

किलो), यशदा अमरसिंह भोसले (५७-६० किलो), अक्षरा गणेश पवार (४४-४६ किलो).

१९ वर्षा खालील मुले सुवर्ण पदक :- पृथ्वीराज पंकज शिंदे (५६-६० किलो), हर्ष शिंगटे (६४-६९ किलो).

१९ वर्षा खालील मुली सुवर्ण पदक :- अपुर्वा प्रशांत कदम (५४ ५७ किलो), जान्हवी भरत कडव (६३-६६

किलो), श्रुती सचिन शिंदे (६६-६९ किलो), प्रांजल दिपक रावळ (७५-८१ किलो).

१७ वर्षा खालील मुली रौप्य पदक :- स्वराली अतुल पवार (८०+ किलो).

१९ वर्षाखालील मुली रौप्य पदक:- अमृता धोंडीराम पवार (४८-५१ किलो).

१४ वर्षाखालील मुले कांस्य पदक : विराज दिपक शेंडगे (४२-४४ किलो),

१९ वर्षाखालील मुली कांस्य पदक :- भाग्यश्री अन्नाप्पा जेऊरे ४५ किलो), आदिती शंकर निकम (५१-५४ किलो).

१९ वर्षा खालील मुले कांस्य पदक :- वेदांत सुनिल निकम (५२-५६ किलो), श्रीराज सतिश शिंदे (७५-८१ किलो)

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांना श्री सुनिल सपकाळ

स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, सॅम्युअल भोरे सहा. स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, प्रशिक्षक

पोहवा / १९० सागर जगताप ( बॉक्सींग प्रशिक्षक), मपोकॉ / ८४ पुजा शिंदे (बॉक्सींग प्रशिक्षक), पोकॉ/ १७९३ दत्तात्रय

भोसले (ज्युदो प्रशिक्षक), मपोकों/ ७५६ स्वाती जाधव (ज्युदो प्रशिक्षक) यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले.

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मधील पदक प्राप्त प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय

कामगिरी बाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक

सातारा श्री. अतुल सबनीस पोलीस उप-अधीक्षक (गृह), श्री. राजू शिंदे राखीव पोलीस निरीक्षक, श्री चंद्रकांत

भोसले राखीव पोलीस उप-निरीक्षक श्री सुनिल चिखले पोलीस उप निरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन

कार्यालय सातारा यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच यापुढे होणा-या स्पर्धाकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments