Type Here to Get Search Results !

फलटण येथील हॉटेल आनंद विलास च्या पुरी भाजी मध्ये सापडली पाल.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण येथील हॉटेल आनंद विलास च्या पुरी भाजी मध्ये सापडली पाल.


 दि.१४/१०/२०२४ रोजी फलटण पंचायत समितीच्या समोर असलेल्या हॉटेल लक्ष्मी विलास मध्ये ग्राहकाला दिलेल्या नाष्ट्यामध्ये (पुरी भाजी)पाल सापडली असुन आमच्या जिवितास धोका आहे अशी फिर्याद साहील अहमद शेख रा.सोनवडी बु.ता.फलटण जि.सातारा फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

आरोपी- १) मुकुंद नारायण ढेरे रा.गजानन चौक फलटण २) एकनाथ अर्जुनराव कापसे रा. मलटण, फलटण ३) हॉटेलचा आचारी यांच्या वरती भा न्या सं कलम १२५,३(५) प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार संतोष कदम हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments