Type Here to Get Search Results !

ATM मशीन मधील पैसे चोरी करणारा आरोपी फलटण शहर पोलीसांच्या ताब्यात

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

ATM मशीन मधील पैसे चोरी करणारा आरोपी फलटण शहर पोलीसांच्या ताब्यात. 



दिनांक 09/09/2024 रोजी श्री सचिन रामराव निंबाळकर, वय ४३ वर्षे, व्यवसाय :- श्रीराम फुडस खाद्य पदार्थ विक्री, राहणार वाठार निंबाळकर, तालुका फलटण हे फलटण शहर येथील IDBI ATM मशीन मधे कॅश भरताना, पैसे भरल्यावर deposit बटण न दाबता, ते निघून केले आणि त्या नंतर आलेल्या व्यक्तीने त्या ड्रॉवर मधील रुपये 28,300/- चोरुन नेले होते. 


फलटण शहर पोलीस ठाण्यातील खालील नमूद अंमलदार यांनी कौशल्याने या गुन्ह्यातील वरील प्रमाणे रोख रक्कम नेणारा आरोपी योगेश शंकर जाधव, वय ३३ वर्षे, राहणार सोमवार पेठ, फलटण शहर यास काल दिनांक १४/१०/२०२४ रोजी अटक केली आहे. आज रोजी त्यास मा. न्यायालयात हजर केले असता, त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. चोरीला गेलेली सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास म.पो.ह.  माधवी बोडके या करीत आहेत. 

वरील कामगिरी पो. हवा. सचिन जगताप, पो. शि. काकासो कर्णे, सचिन पाटोळे, जितेंद्र टिके यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments