सह्याद्री निर्भिड न्युज
फलटण/ वैभव जगताप
फलटण शहरामध्ये अनियंत्रित ध्वनी प्रदुषण केल्या प्रकरणी १० गणेशोत्सव मंडळांवर कारवाई..!
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दि.३१/०८/२०२४ रोजी फलटण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन, गणेशोत्सवाचा आनंद हा समाजातील संपूर्ण नागरिकांना आनंद घेता यावा व सदर गणेशोत्सव हा शांतता, सलोख्याने पार पाडावा यासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापराच्या मार्गदर्शनासहित अन्य सुचना दिलेल्या असताना सुद्धा दि.७/९/२०२४ रोजी फलटण शहरात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेश मुर्तीच्या आगमनाच्या वेळी मिरवणुका काढल्या होत्या.या मिरवणुकांमध्ये फलटण शहरातील १० गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा अनियंत्रितपणे वापर केल्याने त्यांच्या विरुद्ध कलम ३६(इ-अ)१३४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून ध्वनीक्षेपकासाठी वापरण्यात आलेले ५ मिक्सर सेट ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
वरील कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापुराव धायगुडे, पोलीस शिपाई मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे, यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे
Post a Comment
0 Comments