Type Here to Get Search Results !

हनी ट्रॅपच्या मोहाला बळी पडू नका..! लोकांनी तक्रारीसाठी पुढे यावे..!राहुल धस,पोलीस उपअधिक्षक फलटण /सुनील महाडीक, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

हनी ट्रॅपच्या मोहाला बळी पडू नका..! राहुल धस,पोलीस उपअधिक्षक फलटण. 


लोकांनी तक्रारीसाठी पुढे यावे..!-सुनील महाडीक, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण.



लोकांनी हनीट्रॅपच्या असल्या मोहात बळी पडू नये, जर अनवधानाने अशी घटना घडलीच तर तत्काळ नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, ही बाब खासगी असली तरी अशा घटनात तत्काळ गुन्हा दाखल करुन तपास गतीमान केला जाईल. पोलिस ठाण्यात तक्रार जोपर्यत येत नाही तो पर्यंत पोलिसांच्याही अशा बाबी लक्षात येणार नाहीत, त्यामुळे फसवणूक झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा. लोकांनी समाजातील आपल्या प्रतिमेचा विचार न करता गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांकडून संबंधितांविरुध्द तत्काळ कारवाई केली जाईल.

कोणत्याही व्यक्तीची ओळख करण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणे, हे आज आपल्यासह कुटुंबाच्या हितावह राहणार आहे. ओळख नसताना अनैतिकपर्यंत गेल्यास हनी ट्रॅपच्या घटनांना बळ मिळत आहे. आजच्या संबंधित गुन्हेगारांना वाटू लागले की, सहजासहजी याबाबत तक्रार देण्यास कोणी जाणार नाही, याचाच फायदा घेत खंडणी मागितली जात आहे. त्यामुळे हनी ट्रॅपच्या घटनेमध्ये अजून कोणाची अशा पध्दतीची फसवणूक झाली असेल तर संबंधितांनी तत्काळ तक्रार देण्यास यावे.



Post a Comment

0 Comments