सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
कुसुर ता.कराड येथील खुनातील आरोपी २१दिवसांनी जेरबंद.
(स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड तालुका पोलीस ठाणे यांची कारवाई)
खुनाच्या क्लिष्ठ गुन्हयातील आरोपीस तब्बल २१ दिवसांनी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कराड तालुका
पोलीस ठाणे यांना यश.
दिनांक ०२/०९/२०२४ रोजी मौजे कुसूर ता. कराड जि.सातारा येथून राहते घरातुन शिवाजी लक्ष्मण सावंत वय ५२
ही व्यक्ती कोणास काहीएक न सांगता निघून गेले बाबत कराड तालुका पोलीस ठाण्यास मिसिंग दाखल करण्यात आलेली
होती. तद्नंतर दिनांक ०५/०९/२०२४ रोजी सदर इसमाचा मृतदेह मौजे कोळेवाडी गांवचे हद्दीतील मधला माळ नांवचे
शिवारातील भुईमुगाच्या शेतात मिळून आला होता. याबाबत सदर इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केला म्हणून वगैरे
मजकुरचे फिर्यादीवरून कराड तालुका पोलीस ठाणे गुरनं. ५९०/२०२४ भा.न्या.सं.क. १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आलेला होता.
सदरची घटना ही अत्यंत संवेदनशिल व गंभीर असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती
डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, अरूण देवकर
पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक कराड तालुका पोलीस ठाणे यांना सुचना
दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि सुधीर पाटील, स.पो.नि रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, पोउनि
परितोष दातीर, यांचे विशेष पथक तयार करून सदर गुन्हयातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते. याच बरोबर कराड
तालुका पोलीस ठाण्याचे पोउनि सचिन भिलारी यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही सदर गुन्हयातील आरोपीचा शोध
घेण्याबाबत आदेश दिलेले होते.
कुसूर ता. कराड जि.सातारा या गांवात गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व कराड तालुका पोलीस
ठाण्याचे पथक नेमण्यात आलेले होते व सदरची पथके, सर्व शक्यतांचा अभ्यास करून खुन कोणी केला असेल याबाबत
माहिती घेत होते, मा. पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही सुरू होती. मयत इसमाबाबत
जवळपासचे व गांवातील साक्षीदार यांचेकडे केलेल्या विचारपुस व चौकशी वरून तसेच केलेल्या तांत्रीक तपासावरून
सदरचा गुन्हा हा कुसूर गांवातील दिलीप कराळे याने केला असल्याबाबतचा संशय निर्माण झालेला होता. दिलीप कराळे व
इतर साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत दिसून येत होती. पोलीसांना प्राप्त झालेल्या माहिती नुसार आणि
संशयीताच्या हालचालीवरून सदरचा खुन दिलीप लक्ष्मण कराळे यानेच केला असल्याचा संशय अधिक बळकट झालेला
होता त्यानुसार दिलीप कराळे यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता सदरचा खुन हा त्यानेच केला असल्याची
कबुली दिलेली आहे.
सदरचा खुन करण्याचे कारण विचारता आरोपी व मयत यांच्यातील आर्थीक देवानघेवान यामधून झालेल्या वादातुन
विळयासारख्या धारदार हत्याराने खुन केला असलेबाबत कबुली दिली आहे.
सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक
सातारा, श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक अरूण देवकर, महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक कराड तालुका पोलीस ठाणे, स. पो. नि. सुधीर पाटील, स.पो.नि रोहित
फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, पोउनि परितोष दातीर, पोउनि सचिन भिलारे, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक,
सचिन साळुंखे, लक्ष्मण जगधने, अमोल माने, अजित कर्णे, मुनिर मुल्ला, सनी आवटे, हसन तडवी, राजू कांबळे, शिवाजी
भिसे, अरूण पाटील, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, प्रविण कांबळे, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्निल दौंड, केतन
शिंदे, धिरज महाडीक पृथ्वीराज जाधव, रविराज वर्णेकर, सचिन ससाने प्रवीण पवार, वैभव सावंत, अमृत कर्पे, पंकज बेसके,
विजय निकम, संभाजी साळूंखे, दलजित जगदाळे सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, कराड तालुका पोलीस
ठाण्याचे सहायक फौजदार खाडे, धनंजय कोळी सज्जन जगताप, उत्तम कोळी, मोहित गुरव, येळवी, गणेश वेधपाठक, बामने,
निकम यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा
व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments