Type Here to Get Search Results !

गणेश उत्सव शांततेत पार पडावा या करीता रेकॉर्डवरील १४ गुन्हेगारा फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधुन तडीपार.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

 फलटण/ वैभव जगताप 

 गणेश उत्सव शांततेत पार पडावा या करीता रेकॉर्डवरील १४ गुन्हेगारा फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधुन तडीपार.


सर्वत्र गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाचे कालावधीत फलटण

ग्रामीण पोलीस ठाणेचे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेश उत्सव शांततेत

पार पाडावेत या दृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वेळोवेळी गुन्हे करुन सामाजीक स्वास्थ

बिघडवणारे,दंगा गोधळ करणारे १४ गुन्हेगार याना तडीपार करण्यात आले असुन पोलीस निरीक्षक

सुनिल महाडीक यांनी फलटण ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगारावर मा. प्रातअधिकारी फलटण याचेकडे

प्रस्ताव देण्यात आला होता त्या अनुशंगाने त्यानी सदर १४ गुन्हेगारा विरुध्द प्रातअधिकारी तथा

उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले यांचे आदेशाने तडीपार करण्यात आले आहे

१) मनोहर संजय जाधव रा साखरवाडी ता फलटण जि सातारा, २) सागर राजेद्र गायकवाड रा

आसु ता फलटण जि सातारा, ३) आदिनाथ काशिनाथ मोटे रा सरडे ता फलटण जि सातारा ४ )

सचिन बाळु

बोडरे रा पिंपळवाडी ता फलटण जि सातारा, ५) खुशवंत लालासो चव्हाण रा विचुर्णी ता

फलटण जि सातारा,६) सागर युवराज घाडगे रा मलठण ता फलटण जि सातारा ७) किरण भिमराव

घाडगे रा मलठण ता फलटण जि सातारा ८) अक्षय अंकुश जाधव रा ताथवडे ता फलटण जि सातारा

९) सुर्यकांत मुगुटराव निंबाळकररा राजाळे ता फलटण जि सातारा १०) बबन चिंतामणी भिंगारे रा

आसु ता फलटण जि सातारा ११) संतोष नामदेव जगताप रा सुरवडी ता फलटण जि सातारा १२)

अमित बाळासो जगताप रा विडणी ता फलटण जि सातारा १३) विजय बापु कांबळे रा निंभोरे ता

फलटण जि सातारा १४) कुंदा अनिल चौधरी रा निंभारे ता फलटण येथील राहणारे असुन त्याना

दिनांक १३/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ या कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात प्रवेश

करण्यास आणि निवास करण्यास मनाई करण्याचे आदेश निर्गमीत केले असुन नमुद इसमाना फलटण

तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली

कडुकर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस याचे आदेशा नुसार करण्यात आली आहे कायदा

व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक

यांनी तडीपार करुन कायदेशीर कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments