सह्याद्री निर्भिड न्यूज
संपादक -वैभव जगताप
शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई 03 जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन 1,95,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.
शाहुपूरी पोलीस ठाणे मध्ये दि. 24/09/2024 रोजी, दि. 12/08/2024 रोजी तसेच दि.31/07/2024 रोजी जबरी
चोरीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्याप्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. 372 /2024 भारतीय न्याय संहिता
कलम.309(4),115(2),352,3 (5) व शाहुपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 342/2024 भारतीय न्याय संहिता कलम.304 तसेच
शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. 336/2024 भारतीय न्याय संहिता कमल. 309 (4), 3(5) प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते.
सदर जबरी चोरीचे गुन्हे दाखल झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली
कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना सदरचे
गुन्हे उघकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण
शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा तात्काळ शोध
घेवुन अटक करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
दि.29/09/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
हे वाढे फाटा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जावुन माहिती घेवुन गुन्ह्यातील संशयीत इसमाचा शोध
घेत असताना तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयीत इसम हे वाढे फाटा
सातारा येथील परिसरात फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस
अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमांचा शोध घेतला असता ते मिळुन आले.
सदर दोन इसम त्यातील एक विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक
चौकशी केली असता त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण
शाखेने शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. 372/2024 हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तसेच दि.29/09/2024 रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस
अंमलदार हे पारंगे चौक येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळावर जावुन माहिती घेवुन गुन्ह्यातील संशयीत
इसमाचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयीत इसम
हे बुधवार नाका सातारा येथील परिसरात फिरत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमांचा शोध घेतला असता ते मिळुन
आले. सदर दोन इसमाना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्यांनी
सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपूरी पोलीस ठाणे
गु.र.नं. 336/2024 हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तसचे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी
जावुन पाहणी करुन चोरीस गेलेला मोबाईल फोनचा आय. एम. ई. आय नंबर वरुन व तांत्रिक माहितीच्या आधारे दोन
विधी संघर्ष बालक निष्पन्न करुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरी झालेला मोबाईल फोन व गुन्हा करते वेळी वापरण्यात
आलेली मोटारसायकल असा एकुण 53,500/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन शाहुपुरी पोलीस ठाणे
गुरनं. 342/2024 गुन्हा उघडकीस आणला आहे.
अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरी करणाऱ्या आरोपीना गोपनिय व तांत्रिक माहितीचे
आधारे ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरीस गेलेले 75,500/- रुपेय किंमतीचे 03 मोबाईल व 1,20,000/- रुपये
किमतीची गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारसायकल असा एकुण 1,95,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
करुन जबरी चोरीचे 03 गुन्हे उघकीस आणले आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे, गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे, श्री. आय्याज बागवान व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज
मदने, जोतीराम पवार, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार,
सुमित मोरे, संग्राम फडतरे, यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments