सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सातारा जिल्हा पोलीस दलाचा नाविण्यपुर्ण अभया उपक्रम.
सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन महिलांचे सुरक्षीतते करीता नाविण्यपुर्ण असा अभया
उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामध्ये सातारा जिल्हयामध्ये ऑटो रिक्षामधुन प्रवास
करणाऱ्या महिलांना कोणत्याही व्यक्तींकडुन असुरक्षितता भासल्यास किंवा महिलांची कोणी
छेडछाड केल्या, दुष्ट उददेशाने पाठलाग केल्यास महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी
अभया उपक्रमांतर्गत रिक्षामध्ये लावण्यात येणाऱ्या क्युआर कोड स्कॅन करुन स्वतचा मोबाईल
नंबर सामाविष्ठ करुन कळविल्यानंतर तात्काळ मेसेज व लोकेशन सातारा नियंत्रण कक्षास
अवगत केले जाईल. त्यावरुन लोकेशनच्या आधारे तात्काळ पोलीस मदत घटनास्थळी
उपलब्ध होईल. तसेच क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर सदर अॅप्लीकेशन व्दारे फोन करण्याची
सुविधाही देण्यात आलेली आहे.
आज रोजी सातारा शहारातील ॲटो रिक्षांना श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक,
सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर यांनी क्युआर कोडचे स्टिकर चिटकवुन उपक्रमाचा
आरंभ केला. त्यावेळी सातारा शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित
होते.
अभया उपक्रमाअंतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हयातील एकुण ९०००
प्रवासी ऑटो रिक्षांना क्युआर कोड लावण्यात येणार असुन पहिल्या टप्प्यामध्ये २००० रिक्षांची
नोंदणी करण्यात आली असुन त्यांना क्युआर कोडींग करण्याचे काम सुरू करण्यात आले
आहे.
Post a Comment
0 Comments