Type Here to Get Search Results !

सोमंथळी येथे झी टॉकीज प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रमाचे आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज

सोमंथळी/तानाजी सोडमिसे 

सोमंथळी येथे झी टॉकीज प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रमाचे आयोजन.

सोमंथळी ता.फलटण,जि.सातारा येथील स्वयंभू श्री.मारुती मंदिरामध्ये दि.११,१२,व १३ में रोजी दुपारी -२ ते५ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत झी टॉकीज वरील लोकप्रिय कीर्तन मालिकेचे चित्रीकरण होणार असून या चित्रीकरणाचे प्रसारण झी टॉकीज वरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या लोकप्रिय मालिकेत दि.२१ में ते ३० में पासून प्रसारित होणार आहे.


या कीर्तन मालिकेमध्ये ह.भ.प. गोपालक नंदकिशोरजी महाराज बोधेगावकर (बोधेगाव नगर) यांचे जय शनिदेव - कथासार प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री.मारुती देवस्थान ट्रस्ट सोमंथळी, अध्यक्ष -श्री.संजय भगवान सोडमिसे व श्री.मारुती देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ व ह.भ.प.अनिल महाराज कर्वे व समस्त ग्रामस्थ यांचे मोलाचे ठरणार आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments