Type Here to Get Search Results !

ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी यंत्रणा

 

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी यंत्रणा. 


ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे टू व्हीलर चोरीचा प्रयत्न फसला

बुधवार 29/05/2024 रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील कापशी तालुका  फलटण जिल्हा सातारा येथे रात्री 2 वाजता गावातील श्री श्रीकांत गारडे यांच्या घराजवळ लावलेल्या 2-3 टू व्हीलर चोरीच्या उद्देशाने 3 चोर एका टू व्हीलर वरती आलेले आहेत आणि टू व्हीलर चोरण्याचा प्रयत्न करत आहेत हे कळताच, गावचे पोलीस पाटील श्री नितीन जाधव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून  (18002703600) संपूर्ण गावाला ही माहिती कळवली असता गावातील लोक घटनास्थळी दाखल झाले आणि *संपूर्ण गाव सतर्क झाल्याने चोरांचा टू व्हीलर चोरीचा प्रयत्न फसला आणि चोर स्वतः आणलेली टू व्हीलर सुद्धा घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि पुढील अनर्थ टळला.

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला 

बुधवार 29/05/2024 रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील बाळूपाटलाचीवाडी ता.खंडाळा, जिल्हा_सातारा गावात रात्री 12:45 वाजता गावातील श्री बाळासाहेब धोंडीबा धायगुडे यांच्या घरी 2 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत,हे लक्षात येताच गावचे सरपंच श्री नवनाथ धायगुडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले *व संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 2 चंदन चोर जेरबंद करण्यात महाबळेश्वर पोलिसांना यश

बुधवार 29/05/2024 रोजी महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वाणवली तर्फे आटेगाव तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा गावात रात्री 7:13 वाजता गावातील श्री राजेश उतेकर यांच्या पोल्ट्री फार्म च्या शेजारी श्री अशोक उतेकर यांच्या मालकीच्या जागेतील चंदनाचे झाड तोडण्याचा काही चंदन 5 चोर प्रयत्न करत आहेत हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील श्री सुभाष कदम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600) सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री यशवंत नलावडे साहेब यांच्या आदेशान्वये महाबळेश्वर पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले.गावकरी घटनास्थळी येत असल्याची चाहूल लागताच चोरांनी तेथून पळायला सुरुवात केली आणि गावकऱ्यांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू आणि 2 चोर त्यांच्याकडे असणाऱ्या साहित्यासह जेरबंद करण्यात वाणवली तर्फ आटेगाव ग्रामस्थ तसेच महाबळेश्वर पोलिसांना यश आले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments