सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
'माझे कर्तृत्व माझा सन्मान'!!
सर्वात मोठा सन्मान सोहळा...
कोल्हापूर येथून प्रकाशित होत असलेले दैनिक रोखठोक महाराष्ट्रभर विविध प्रश्नांवर वाचा फोडत आहे. समाजाला चांगले देणे आणि वाईट गोष्टींवर रोखठोक प्रहार करणे यामुळेच हे दैनिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. सामाजिक मूल्य जपत आणि प्रत्येकाला प्रेरणा देत या दैनिकाची घोडदौड सुरू आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चांगले शिकता येते.अशा प्रेरणादायी व्यक्तींची समाजाला फारशी ओळख नसते. या जगात अनेक कोहिनूर हिरे आपल्या कर्तृत्वाने चमकत असतात. ते निस्वार्थीपणे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. मात्र त्यांची दखल योग्य पातळीवर घेतली जात नाही, म्हणूनच गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून दैनिक रोखठोकच्या वतीने खास पुरस्कार सोहळा आयोजित केले आहेत. हा पुरस्कार मानाचा आणि प्रतिष्ठेचा आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टाळ्याच्या कडकडाटात स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र तसेच शाल, श्रीफळ देऊन त्यांचा येथोचित गौरव होईल. हा सन्मान योग्य व्यक्तीला मिळावा म्हणून आपल्या भागातील तसेच आपणाला माहीत असलेल्या निस्वार्थी तसेच सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या व्यक्तींपर्यंत हा संदेश पोहोचवा. त्यांच्या कार्याला न्याय मिळेल.' माझे कर्तृत्व माझा सन्मान' या भावनेतून आम्ही त्यांची निवड करु. पुरस्कारामुळे त्यांचे कार्य अधिक प्रकाशमान होईल.
संपर्क- सुरेश माडकर,
मुख्य संपादक
दैनिक रोखठोक, कोल्हापूर
मो.9175720634
संपर्क -वैभव जगताप
सातारा जिल्हा प्रतिनिधी
दैनिक रोखठोक व्हिजन
मो-8007852121
टीप -कृपया हा मेसेज योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments