सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
यात्रेमध्ये हातात पिस्टल घेऊन दहशत निर्माण करणाऱा युवक पोलिसांच्या ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई
कोरेगाव तालुका कराड गावचे यात्रेमध्ये हातात पिस्टल घेवून वावरणाऱ्या युवकाकडून एका
काडतुसासह पिस्टल हस्तगत केले.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक यांनी लोकसभा
निवडणुक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या
इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस
निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
यांचे पथक तयार केले होते.
मौजे कोरेगांव, ता. कराड येथे गांवचे वार्षीक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिस्टल घेवून
वावरत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त
झालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली
असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी सुचना देवून मौजे कोरेगांव, ता. कराड या गांवचे
परिसरात पेट्रोलींग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
दिनांक २५/०५/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील
व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने कार्वे तसेच कोरेगांव तालुका कराड परिसरात पेट्रोलिंग करीत
असताना मिळाले बातमी मधील वर्णनाप्रमाणे एक युवक कोरेगांव ता. कराड बाजूकडून येणारे रस्त्याने पायी चालत
येत असताना दिसला त्याचा वाजवी संशय आलेने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे
कब्जात ७०,०००/- किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस किंमत रु.२०० असा एकुण ७०२००/-
चा मुद्देमाल त्याचे ताब्यात मिळून आलेने त्या युवकाविरुध्द कराड तालुका पोलीस ठाणे गुरनं. ३४९/२०२४ शस्त्रबंदी
अधिनियम (सुधारीत) २०१९ चे कलम ३,७,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपावेतो ८७ देशी बनावटीची पिस्टल, ३
बारा बोअर बंदूक, १ रायफल, १९७ जिवंत काडतुसे, व ३८५ रिकाम्या पुंगळ्या, १ रिकामे मॅग्झीन असे जप्त
करण्यात आलेले आहेत.
सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस
अधीक्षक सातारा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
स.पो.नि. सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक
सुधीर बनकर, पो.हवा. विजय कांबळे, संजय शिर्के, अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक,
सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, अमृत करपे,
दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील स.पो.नि. अभिजीत चौधरी, पोलीस
अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळी यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे लोकसभा निवडणूक
आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख
पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अतुल सबनीस, पोलीस उपअधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments