फलटण येथे प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न
प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध.. महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
प्रतिनिधी
वैभव जगताप
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या चेअरमन पदी राजेंद्र बोराटे व व्हा.चेअरमन पदी विजय बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा प्राथमिक शिक्षक संघ, समिती व सभासद परिवर्तन पॅनेल यांच्या वतीने फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमाचे सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली प्रास्ताविक ग बा पवार सर व प्राथमिक शिक्षक संघ फलटण तालुका अध्यक्ष संतोष कोळेकर यांनी केले
यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील,अखिल भारतीय शिक्षक संघ दोंदे गटाचे दीपक भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते
प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी आमच्या शिक्षकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवावेत व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले की, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे काम अत्यंत उत्कृष्ट चालले असून नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र बोराटे व व्हॉइस चेअरमन विजय बनसोडे अत्यंत उत्कृष्ट सर्वोच्च शिखरावर पोहोचवतील अशी आशा व्यक्त केले ४० वर्षानंतर प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन पद फलटण तालुक्याला मिळाल्याचा फलटणवासीयांना अभिमान आहे तसेच राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपण
ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले
👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
संपादक -वैभव जगताप. मो.८००७८५२१२१
Post a Comment
0 Comments